सारवलेल्या भिंतीवरुनी निघताना
फिरवते हात एकदा
गपगुमान सांभाळा
आपल्या या धाकलीला.
जाते मी, गाडग्यात आहे
घास ठेवलेला.
निमूट रहा रक्षण कर तोवर
धाकात ठेव त्यांना, येते लवकर
येतील कोणी वास घेत मुलींच्या वाटा
तेव्हा तर प्रतिकार कर, पकड त्याच्या जटा.
. . . . .
. . . . . .
. . . . . .
दमून भागून आले मी पण
भाकरतुकड्यासाठी वणवण
इवलासा तुकडा तुला
बाकी संसाराला.
उद्याच्या लागते तयारीला, झोप तू निवांत
दादला कोठे गेलाय ठाव नाय
नको करु खंत.
फिरवते हात एकदा
गपगुमान सांभाळा
आपल्या या धाकलीला.
जाते मी, गाडग्यात आहे
घास ठेवलेला.
निमूट रहा रक्षण कर तोवर
धाकात ठेव त्यांना, येते लवकर
येतील कोणी वास घेत मुलींच्या वाटा
तेव्हा तर प्रतिकार कर, पकड त्याच्या जटा.
. . . . .
. . . . . .
. . . . . .
दमून भागून आले मी पण
भाकरतुकड्यासाठी वणवण
इवलासा तुकडा तुला
बाकी संसाराला.
उद्याच्या लागते तयारीला, झोप तू निवांत
दादला कोठे गेलाय ठाव नाय
नको करु खंत.