रबराची
ती लाकडाची ती
सोंगटी खरी
माझीच व्यथा ही
सांगते भली बुरी
मी एक सोंगटी या घरात
ती
एक सोंगटी त्या घरात
कामाची यादी मनातल्या मनात
नाचत असतो माजघरात ||
टाकूनी मज नोकरीच्या
घरात
म्हणे तुमची मजा ऑफ़िसात
लवकर येताच पडते पाळणाघरात
बाब्याचा पापा घेउन येते दारात ||
तेव्हा तू असतोस थिएटरात
कारण
तू तर नाही सोंगटीच्या खेळात
फ़ासा तर फ़ासा टाकतोस तरी
खेळतोस मात्र चिटिंग भारी ||
समजून
घे ना सोंगटीच्या मालका
शेवटच्या घरात माझाच दणका
विजय माझा पचेल का?
आता तरी सोंगटीला
जपशील का ?
No comments:
Post a Comment