बुटातले खडे बुटातल्या खड्यासाठी सारखं का वाकावे बोलणाऱ्या नवऱ्याचं तोंड का धरावें चालताना जातात कितितरी खडे बिनबुडाच्या आरोपासाठी दुःख करावे केव्हढे सवय झाली खड्यांची बारीक बारीक कणांची त्याच्या घरच्या माणसांची समजून न घेणाऱ्या मनांची ज्योबोदीका
सारवलेल्या भिंतीवरुनी निघताना फिरवते हात एकदा गपगुमान सांभाळा आपल्या या धाकलीला. जाते मी, गाडग्यात आहे घास ठेवलेला. निमूट रहा रक्षण कर तोवर धाकात ठेव त्यांना, येते लवकर येतील कोणी वास घेत मुलींच्या वाटा तेव्हा तर प्रतिकार कर, पकड त्याच्या जटा. . . . . . . . . . . . . . . . . . दमून भागून आले मी पण भाकरतुकड्यासाठी वणवण इवलासा तुकडा तुला बाकी संसाराला. उद्याच्या लागते तयारीला, झोप तू निवांत दादला कोठे गेलाय ठाव नाय नको करु खंत.
सहज तिच्या पदराला हात लागला माझा झटका बसला तसा हात खाली आला. असंख्य मुंग्या तिच्या पदराला कडकडून चावा घेतला माझा. वेदनांची शिदोरी तिच्या पदरातही ! अनुभवली भर रस्त्यात घामाच्या दरवळीने मस्तक भणभणले थांबव अती तुझी वणवण मन माझे चिंतारले चावणार्या धावणार्या लाल - काळ्या त्या त्यांनी विणलेला आयुष्याचा शेला शेला कसला, ती आहे वेदनांची जाळी अजुनही जपली आहे पुस्तकातील पिंपळपानासारखी.
बाई आहे बाईच राहीन पुढचा जन्म बाईचा लेईन. समजून घेईन मनाची जागा, संवादाचा जोडीन सांधा. गुंतत जातो गुंत्यांचा पुंजका, हातात घेऊन एक एक करीत सोडवत नेईन. इच्छांच्या पिशवीला वेळीच शिवीन बंद, नकोत आता मला नात्यात निर्बंध. बाई आहे बाईच राहीन. संकटाचे पैंजण पायात घालीन, नाद त्यांचा ऐकत तळव्यावर नाचवीन. बाई आहे बाईच राहीन. अन्यायाच्या फुलांचा डोक्यात वर्षाव - लिखा समजून चिरडून टाकीन. बाई आहे बाईच राहीन. ढालीत मी स्वतःला बघेन. वेळ आली की ढालच होईन. बाई आहे बाईच राहीन.