तो
फकस्त तोंडी लावणा
मी त्याची भाकर
सकाळ पासुन कामाची
वाहून जाते घागर
दादला माझा कुंकवाचा
आयाबायांसाठी मिरवायचा
गाठीच्या लुगड्याला घेउन
तो मात्र सुटायचा
भाकरीसाठी जुंधळं
जुंधळ्यासाठी हिरवं शेतं
शेताचा त्यो मालक
माझे घेतो
दोन हात
माझ्य़ातला राग राग
दबत नसतो काही
शेतात हात घातला
मातीच वेदना साही
घरला याची
भेंडोळी
पोरांच्या पुढ्यात
बुजगावणं तरी बरं
उपयोग त्याचा शेतात
काय सांगू तोंडी लावणा
मी त्याची भाकर
घरात आता काय नाय
आहे पोरांची पाखर.
No comments:
Post a Comment